कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर खोपोलीचा आठवडा बाजार बंद
 



जगभर कोरोनो व्हारासमुळे सर्वच चिंतेत असतानाच पुणे शहरात 5 रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. खोपोलीत देखील दर गुरुवारी आठवठ्याचा बाजार भरत असतो यादरम्यान मंबई -पुणे येथून फेरीवाले येत असून यावेळी गर्दीमुळे या रोगाने खोपोलीत डोके वर काढू नये यासाठी कोरोनो व्हारस आटोक्यात येत नाही तोपपर्यत गुरुवार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.


या मागणीचे निवेदन पत्र सेनेचे माजी शहर प्रमुख राजन सुर्वे यांनी नगरपालिकेत सादर केले होेते.त्याची दखल घेत  ारोग्य सभापती वैशाली जाधव यांनी आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांना  तातडीने पाठवून गुरुवार बाजार बंद ठेवण्यास सांगितले आहे.तर सुर्वे यांच्या गुरूवार बाजार बंदच्या मागणीला बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांनी पांठिबा दिला आहे.


खोपोली बाजारपेठेत आठवड्याच्या गुरुवार बाजार भरत असून यावेळी मुंबई, कुर्ला, अंबरनाथ , उल्हासनगर तसेच इतर भागातून फेरीवाले व्यापारी येतात दरम्यान आठवड्याच्या बाजारत खरेदीसाठी पाली,खालापूर तालुक्यातील महिलावर्ग मोठ्या संखेने येतात यावेळी कोरोनो व्हारस लागण एखाद्याला असल्यास शहरात हा महारोग फोफावण्याची शक्यता  नाकारता येणार नाही.