करोनाचा गेल्या २४ तासांत एकही नवा रुग्ण नाही

नवी मुंबई : गेल्या २४ तासांत नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २८वर राहिली आहे. नवी मुंबईत कोव्हिड-१९ची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या १३२ झाली असून त्यापैकी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ८४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप २० रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण १०६६ नागरिकांचे घरी विलगीकरण केले आहे. २२ नागरिक अलगीकरण कक्षात आहे. घरी विलगीकरण करण्यात येत असलेल्या एकूण नागरिकांपैकी ५०३ नागरिकांनी आपला १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. महापालिका रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात २४ नागरिक उपचार घेत आहेत.